Top News महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे पण हीच शिवसेना…”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.

सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?, असा सवालही नेते राम कदम यांनी केला आहे. राम कदमांअगोदर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आजच्या अग्रलेखावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मरतुकड्या विरोधी पक्षामुळे ‘पेटत’ नसल्याची खंत सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे. ही तर कमालच झाली. महाराष्ट्राचा ‘वाघ’ गेले आठ महिने घरी बसून मोदी-शहांवर भडिमार करतोय. मुखपत्रातून आग ओकतोय,त्यालाही घरच्यांनीही मरतुकडा म्हणावं हे जरा अतिच नाही का?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

एमआयएमचा डोळा असलेली ‘ही’ महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत

पोलिसांचा कॅफेवर छापा; तपासादरम्यान समोर आला धक्कादायक प्रकार

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही- विजय वडेट्टीवार

मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ‘या’ कृतीनं जिंकली चाहत्यांची मनं!

“…म्हणून मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या