राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

मुंबई | घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे. 

दिवाळीनिमित्त राम कदम यांनी सुरक्षारक्षकांना ओडोमॉसचं वाटप केलं. त्याचा व्हीडिओ त्यांनी फेसबुकवर टाकला आहे. 

या व्हीडिओवर अनेकांनी राम कदम यांच्यावर टीका केली आहे. राम कदम सर्व प्रसिद्धीसाठी आणि उत्तर भारतीय मतांसाठी करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, त्यांच्या मुली पळवण्याच्या वक्तव्याचा संबंध सुद्धा अनेकांनी या व्हीडिओसोबत जोडला आहे. त्यासंदर्भात कमेंटसुद्धा या पोस्टवर पहायला मिळत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे

-भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन