मुंबई | जेजूरी येथे उभारण्यात आलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्याआधीच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं. याप्रकरणातून सुरू झालेला वाद आता शिगेला पोहचला आहे. पुतळ्याच्या अनावरणावरुन पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तरं देण्यात आलं.
पडळकरांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालं आहे, भाजप किती अस्वस्थ झालेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पडळकरांची वक्तव्य, असं म्हणत जयंत पाटलांनी पडळकरांवर निशाणा साधला. पुण्यातल्या एका चांगलं काम करणाऱ्या महिलेने उभारलेल्या मतदारसंघात जाऊन तिथून निवडणूक लढवणं यात पुरुषार्थ आहे का?, असं म्हणत जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती.
या जयंत पाटलांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप नेते राम कदम यांनी एक ट्विट केलं आहे. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य जयंत पाटील यांच्या जिव्हारी लागलं आहे. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होतं की, चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही, असा टोला राम कदमांनी जयंत पाटलांना लगावला आहे.
दरम्यान, ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावं लागतं, अशा लोकांबद्दल मी बोलायचं का, असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला होता. त्याला जोरदार प्रत्युत्तर देत माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचं जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केली होती.
चंद्रकांतदादांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.@Jayant_R_Patil जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की,@ChDadaPatil महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 15, 2021
थोडक्यात बातम्या-
…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार
‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!
मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे
पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!
रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका