Top News मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

“राज्यातील काँग्रेसचे नेते बॉलिवूडच्या अभिनेत्यांना धमक्या देत आहेत”

मुंबई | काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिनेअभिनेत्याला धारेवर धरलं आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि बिग बी अमिताभ बच्चन यांना खोचक प्रश्न करत, त्यांच्यावर टीका केली होती. या अभिनेत्यांचा बचाव करायला भाजप नेते राम कदम आता मैदानात उतरले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर टिव टिव करणारे अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली होती. याच सोबत अक्षय आणि अमिताभ बच्चन यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्यातील काँग्रेस पक्षातील नेते बाॅलिवुड अभिनेत्यांना धमकी देत आहेत. काँग्रेस पक्षाला झालयं तरी काय? असे प्रतिउत्तर राम कदम यांनी नाना पटोलेंना दिले आहे. असे असले तरी देशाच्या बाजुने जे कोणी बोलेल त्याच्या बाजुने संपुर्ण देश उभा आहे. असे म्हणत राम कदम यांनी अभिनेत्यांचा बचाव देखील केला. ते मराठी वृत्तवाहिनी टीव्ही 9शी बोलत होते.

याआधी देखील नाना पटोले यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना धारेवर धरलं होतं. अभिनेत्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेली वाढ दिसत नाही का? अस म्हणत भाजपला देखील टोला लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घडतंय असं, ‘या’ महिलेला दिली जाणार फाशी!

पूजाला होता ‘हा’ आजार, आई-वडिलांनी दिली महत्त्वाची माहिती

टोल प्लाझा पुन्हा राज ठाकरेंच्या निशाण्यावर?; 21 फेब्रुवारीनंतर उचलणार हे पाऊल

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या