Top News

‘…तर भर चौकात त्यांना जोड्यानं मारू’; राम कदम आक्रमक

मुंबई | सैफ अली खान, डिम्पल कपाडिया यांची मुख्य भूमिका असलेली तांडव ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापुढे चित्रपट विश्वातील लोकांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावलं जाईल, असं भाजप नेते राम कदम म्हणालेत.

कोणत्याही परिस्थितीत तांडव या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्या सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अवमान करण्याचं कृत्य केलं आहे. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समजाची माफी मागायला हवी, असं राम कदम यांनी म्हटलंय.

दरम्यान, राम कदम यांनी तांडव या वेब सीरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे ‘या’ दिवशी दिसणार एकाच मंचावर!

‘धनंजय मुडेंवर आरोप करणाऱ्या तरूणीचं तोंड बंद करण्यासाठी पवारांनी ‘त्या’ जुन्या तंत्राचा खुबीने वापर केला”

‘पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करा’; माजी सनदी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र

“छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचं आराध्यदैवत, आदर्शांचा वापर मतांची पोळी भाजण्यासाठी नाही”

“ज्यांचं बोट धरुन महाराष्ट्रात आले त्याच सेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या