Ram Mandir | तब्बल 500 वर्षांनंतर रामलला अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी 2024 रोजी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य राम मंदिराचे उद्घाटन पार पडले. भाविकांच्या देणगीतून भव्य राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. नामांकित मंडळीपासून ते सर्वसामान्य नागरिक या मंदिरासाठी देणगी देत आहेत. खरं तर सुरतमधील एका व्यावसायिकाने रामललाला तब्बल 11 कोटी रुपयांचा हिऱ्याचा मुकुट भेट दिला आहे.
सोमवारी झालेल्या या कार्यक्रमानंतर संपूर्ण भारतात दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमाचा सोहळा लोकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या आनंदात सुरतच्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल आपल्या कुटुंबासह अयोध्येला पोहोचले. मुकेश पटेल यांनी रामललाला हिरे, सोने आणि अनेक प्रकारच्या रत्नांनी जडलेला मुकुट अर्पण केला आहे.
रामललाला रत्नांनी जडलेला मुकुट ‘भेट’
दरम्यान, या मुकुटाचे वजन साडेचार किलो आहे. मुकेश पटेल यांनी हा मुकुट श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त आणि मंदिराचे मुख्य पुजारी यांना अभिषेक प्रसंगी सुपूर्द केला. 5 जानेवारीला या कंपनीने मुकुटसह आपल्या दोन कर्मचाऱ्यांना विमानाने अयोध्येला पाठवले होते.
तसेच 3 किलो चांदीपासून बनवलेल्या मंदिराच्या दोन प्रतिकृतीही राम मंदिराला भेट देण्यात आल्या आहेत. यापैकी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर दुसरी मोहन भागवत यांना भेट दिली. ही चांदीची मंदिरे सुरतच्या एका ज्वेलर्सने बनवली आहेत. डी खुशालभाई नावाच्या ज्वेलर्सने चार महिन्यांपूर्वी बनवायला सुरुवात केली होती.
Ram Mandir सर्वसामान्यांसाठी खुले
डी कुशलदास ज्वेलर्सचे मालक दीपक चोक्सी यांनी पीटीआय या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, गुजरातमधील सुरत हे हिरे, चांदी आणि सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. डी खुशालभाई ज्वेलर्सने बनवलेली मंदिरे पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांना भेट म्हणून देण्यात आली आहेत. चार महिन्यांपूर्वी आम्ही मुख्यमंत्री योगींना भेटलो तेव्हा त्यांनी मंदिराच्या मॉडेलमध्ये रामलला बसवण्याचा सल्ला दिला होता.
सोमवारपासून राम मंदिर सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी खुले झाले आहे. मंदिराचे उद्घाटन होताच भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. दिग्गजांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराचे उद्घाटन केले. यानंतर योगी आदित्यनाथ, मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. राम आग नसून ऊर्जा असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.
News Title- Mukesh Patel, a diamond merchant who owns Green Lab Diamond Company in Surat, Gujarat, gave a crown of Rs 11 crore for Ramlala
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI Awards 2024 | गिल सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू; शमी, अश्विन, बुमराहसह शास्त्रींचाही सन्मान
Ram Mandir | फोन, रोकड, ATM लंपास! रामललाच्या दर्शनासाठी आलेल्यांमध्ये चोरट्यांचा वावर
कोण होते माजी मुख्यमंत्री Karpuri Thakur? ज्यांना मिळणार ‘भारतरत्न’, वाचा सविस्तर
Virat Kohli ची सुट्टी! युवा खेळाडूला ‘संधी’, IND vs ENG साठी द्रविडनं सांगितली रणनीती
Nita Ambani वापरतात ‘या’ बड्या कंपनीचा फोन; किंमत लाखोच्या घरात, अयोध्येत दिसली झलक