राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘संघ दक्ष’; 25 नोव्हेंबरला पहिली हुंकार रॅली

नागपूर | राम मंदिराच्या उभारणीसाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. 25 नोव्हेंबरला पहिल्या हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

नागपुरात ही हुंकार रॅली पार पडणार आहे. याच दिवशी अयोध्या आणि बंगळुरुमध्येही हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 

25 नोव्हेंबर रोजी उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात एकत्र हुंकार रॅली होतील. त्यानंतर थेट दिल्लीत हुंकार रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे. 

सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता थेट अध्यादेश काढून किंवा कायदा निर्माण करुन राम मंदिराची उभारणी करावी, अशी संघ परिवाराची भूमिका आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-सोशल मीडियावर #JusticeForAvni ; सरकार आणि मुनगंटीवार आरोपीच्या पिंजऱ्यात

-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल

-अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

-…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या