भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

मुंबई | दुष्काळामुळं शेतकरी संकटात असताना राम मंदिराचा मुद्दा काढून भाजप नेते समाजात दुही पसरवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

केंद्रातील भाजप सरकार शेतकरी हिताचं धोरण राबवण्यात अयशस्वी ठरल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. ते मुंबईत आयोजित शेतकरी हक्क परिषदेत बोलत होते.

भाजप सरकारचा घटनात्मक संस्थांना दुबळं करण्याचा प्रयत्न असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

भाजपला रोखण्यासाठी पुरोगामी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी भाजप सरकारवर राफेल खरेदी करारावरुन देखील टीका केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!

-स्पायडर मॅन, हल्क यांसारख्या सुपर हिराेंना जन्म देणाऱ्या स्टॅन ली यांचं निधन

-…आणि शरद पवारांनी त्या आजोबांना नावानिशी ओळखलं!

-भाजपला धक्का!!! धुळ्याचे आमदार अनिल गोटे राजीनामा देणार