Ram Mandir | 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. शेकडो वर्षांनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्येत दर्शनासाठी लोकांची ये-जा सुरू आहे. राम नगरी अयोध्येला जाण्यासाठी काही लोक विमानाने तर काही रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीने प्रवास करत आहेत. मुंबईतील शबनम शेख (Ram Bhakt Shabnam Shaikh) ही मुस्लिम राम भक्त मुलगी तब्बल 41 दिवस पायी प्रवास करत अयोध्येला पोहचली.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशीच शबनम अयोध्येत पोहचली होती. मात्र, तिला दर्शनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागली. अयोध्येला पोहोचल्यानंतर शबनम म्हणाली की, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिला सर्वांनी साथ दिली. उत्तर प्रदेश पोलिसांनी पूर्ण सुरक्षा प्रदान केली. यासाठी तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. तसेच योगींना भेटण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
41 दिवस चालत गाठली अयोध्या
तसेच प्रभू श्री रामाच्या जन्मस्थळावरून तिने भक्तांना एक आवाहन केले आहे. घरी बसून धर्माचा प्रसार करता येत नाही, टीव्हीवर बसून काही बोलण्यापेक्षा इथे आलेले बरे… इथे या रामललाचे दर्शन घ्या. तुम्हाला देखील माझ्यासारखा आनंद मिळेल. प्रसन्न वाटेल रामललाकडून प्रेम मिळेल, असे शबनमने सांगितले.
दरम्यान, राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी शबनम शेख पायी मुंबईहून अयोध्येत गेली. शबनम शेखने तिच्या तीन सहकाऱ्यांसह अयोध्येला जाण्याचा बेत आखला होता. “रामलला 500 वर्षांनी येत आहेत. म्हणून दर्शन घ्यावे. मित्रांना विचारले असता त्यांनीही सांगितले की रामलला आमचेही आहेत आणि आम्हीही दर्शनाला तुझ्यासोबत येऊ”, असे शबनम सांगते.
Ram Mandir मुंबईच्या शबनमचा पायी प्रवास
तिने सांगितले की, 21 डिसेंबर रोजी मुंबईतून प्रवास सुरू केला. 40 दिवसांत अयोध्येला पोहोचले. कुठेही अडचण आली नाही. अनेक सनातनी बांधवांनी स्वागत केले. माझ्यासोबत हनुमानाचा ध्वज होता. वाईट लोक विरोध करतात, चांगले लोक सहकार्य करतात याचा अनुभव घेत घेत पाऊले टाकली. एकूणच हा प्रवास अविस्मरणीय राहिला.
जगद्गुरू परमहंसाचार्य यांनी शबनमला रामललाची मूर्ती भेट दिली. ठिकठिकाणी शबनमचे स्वागत करण्यात आले. शबनम म्हणाली की, तिला इथे आल्याचा आनंद वाटत आहे. इतक्या दिवसांची तपश्चर्या अखेर पूर्ण होत आहे. एक मुस्लिम तरूणी चालत अयोध्येकडे कूच करत असल्याचे समोर येताच शबनमला प्रसिद्धी मिळाली.
कोण आहे शबनम शेख?
शबनम ही मुंबईतील रहिवासी आहे. 21 डिसेंबर रोजी ती मुंबईहून अयोध्येला पायी निघाली होती. शबनमने भगवान श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी 1425 किलोमीटरचे अंतर पायी कापले आहे. मात्र, त्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही. 40 दिवसांची तपश्चर्या पूर्ण झाल्याचे ती सांगते.
News Title- Shabnam Shaikh, a Muslim girl from Mumbai, expressed her desire to meet Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath after going to Ayodhya
महत्त्वाच्या बातम्या –
Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार
Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान! महाराष्ट्र भूषण जाहीर; CM शिंदेंची घोषणा
वर्ल्ड क्रिकेटचा कारभार Jay Shah यांच्याकडे? BCCI सचिव बड्या पदाच्या शर्यतीत!
Sukesh Chandrashekhar च्या फसवणुकीत जॅकलीनचाही ‘हात’, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ; ED चा मोठा दावा
Vicky Jain | विकी जैनचा सुशांतबद्दल मोठा खुलासा; म्हणाला,”अंकिता आणि सुशांतमुळे..”