Top News

“कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत रोखू शकेल”

अयोध्या | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद पेटला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अयोध्येते येऊ नये, असं अयोध्येतील संतांनी म्हटलं होतं. मात्र श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

कुणाच्या आईनं त्याला इतकं दूध पाजलंय की तो उद्धव ठाकरेंचा सामना करेल आणि तेदेखील अयोध्येत… कुणाच्या आईनं इतके जिरे खावून इतक्या शक्तीशाली मुलाला जन्म दिलाय की तो गंगेला रोखू शकेल, असं म्हणत चंपत राय यांनी ठाकरेंना अयोध्यते येण्यासाठी विरोध करणाऱ्यांना आव्हान दिलं आहे.

अयोध्येत असं कोण आहे, ज्याच्या आईनं इतके जिरे खाल्यानं अशा संतानानं जन्म घेतलाय की तो अयोध्येत उद्धव ठाकरेंना येण्यापासून रोखू शकेल, असंही चंपत राय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  कंगणा राणावतचं कार्यालयावर मुंबई महापालिकेने हातोडा मारण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर  उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये अशी घोषणा केली होती. जर ते आलेच तर त्यांचे स्वागत होणार नाहीच पण त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागेल, असं म्हणत विश्व हिंदू परिषदेने ठाकरेंना इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या-

‘सुशांतच्या फार्महाऊसवर रियाच्या आधी येत होती ही अभिनेत्री’; फार्महाऊस मॅनेजरचा धक्कादायक खुलासा

…म्हणून 10 सरकारी पाठशाला कायमस्वरूपी बंद; शालेय शिक्षण विभागाच निर्णय

‘…यासाठीही हिरोसोबत झोपावं लागतं’; कंगणाचा पुन्हा जया बच्चन यांच्यावर निशाणा

मराठा समाज आक्रमक!आजपासून कोल्हापूरमधूम मुंबई, पुण्याला दुध पुरवठा बंद

दिवाळीच्या मुहूर्तावर फुटणार अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या