Top News

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

नवी दिल्ली | जर कोणीही अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल, असं राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.

दरवर्षीप्रमाणे यंदा स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे, असं रामनाथ कोविंद यांनी सांगितलं आहे.

जगासमोर एक सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे, त्यावेळी सर्वांना त्याचा एकत्रित सामना करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेजारी राष्ट्रानं त्यांच्या विस्तारवादी भूमिकेचा अवलंबक करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं, असंही रामनाथ कोविंद म्हणाले.

दरम्यान, आपल्या सीमेचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी झटणाऱ्या सैन्य दल, पोलीस आणि निमलष्करी दलांचा आम्हाला अभिमान आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

…तर नाईलाजाने डॉक्टरांवर मेस्मा लावाला लागेल, हसन मुश्रीफ यांचा इशारा

पार्थ समजदार, तो झाला प्रकार विसरून जाईन; कोल्हापूरच्या आत्याची प्रतिक्रिया

सुप्रिया सुळेंनंतर पार्थ पवार आता अभिजीत पवारांच्या भेटीला

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याची दक्षता घ्या, अजितदादांच्या कडक सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या