सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच!

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असो, आम्ही राम मंदिर उभारणारच, असं वादग्रस्त वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केलं आहे.

राम मंदिरप्रकरणी लवकर निकाल यावा यासाठी आम्ही या खटल्याच्या सुनावणीसाठी वेगळ्या खंडपीठाची मागणी केली होती. दीर्घकाळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे, असंही त्या म्हणाल्या.

आम्हाला फक्त तारखाच मिळत आहेत. आता सर्व हिंदू निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निर्णय आला पाहिजे, त्यामुळे हिंदूच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, न्यायालयात राममंदिरांच्या बाबतीत सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलली असून जानेवारीमध्ये याची सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून विराट बीसीसीआयकडे मागतोय केळी

-भाजप अध्यक्ष अमित शहांविरोधात देशद्रोहाची तक्रार

-प्रचाराला येताना पाठीला तेल लावून या; शिवसैनिकाचा शिवसेना नेत्यांना दम

-ही तोडफोड पाहून सरदार पटेलांनाही रडू आलं असतं; गावकऱ्यांचं मोदींना पत्र

-महाराष्ट्रातील गावांमध्ये दारु मिळते पण पाणी मिळत नाही- राजेंद्र सिंह

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या