राम-रहीमला पुन्हा एकदा पॅरोल मंजूर
नवी दिल्ली | हत्याकांड आणि रेपच्या केस प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राम-रहीमला पॅरोल देण्यात आलं आहे. बाबा राम-रहिमला याआधीदेखील 40 दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता. आता पुन्हा त्याला 40 दिवसांची पॅरोल देण्यात आली आहे.
येत्या 25 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी हा पॅरोल देण्यात आला आहे. डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांची जयंती 25 जानेवारीला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी राम रहीमला पॅरोल मिळाला आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये राम रहीमला पॅरोल मिळाली होती.
या 40 दिवसांच्या पॅरोलमधून बाहेर आल्यानंतर यूपीमधील बर्नावा आश्रममध्ये राम रहिम राहणार आहे. 2022 मध्ये राम रहीमला तीन वेळा पॅरोल मिळाला होता. 91 दिवस तो तुरुंगाबाहेर होता. यावरुन हरियाणा सरकार राम रहिमवर मेहरबान असल्याची टिका केली जात आहे.
दरम्यान, साध्वी लैंगिक शोषण, छत्रपची रामचंद्र आणि रणजित हत्या प्रकरणात राम रहिमला 20 वर्षाची शिक्षा सुणावण्यात आली होती. मध्यंतरी मिळालेल्या पॅरोलवर राम रहीमनं तीन गाणी सुद्धा रेकाॅर्ड केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.