देश

…नाहीतर आम्ही बाबा राम रहिमला तुरुंगातून पळवून नेऊ!

चंदीगड | 72 तासात बाबा राम रहिमला सोडा, नाहीतर आम्ही त्यांना तरुंगातून पळवून नेऊ, अशी धमकी हरियाणा पोलिसांना देण्यात आलीय. या धमकीनंतर तुरुंगाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. 

पोलीस महासंचालक बी. एस. संधू यांना यासंदर्भात निनावी फोन आला होता. ज्या नंबरवरुन फोन आला ते सीमकार्ड इंग्लंडमधील असून चंदीगडमधूनच हा फोन करण्यात आला होता.

दरम्यान, साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहिम सध्या रोहतकच्या तुरुंगात 20 वर्षांची शिक्षा भोगतोय. 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या