पुणे | भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना भगवद्गिता भेट केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पोस्टाद्वारे या ग्रंथाची प्रत पाठवण्यात आली आहे.
पत्रकारांसमोर गीतेचा श्लोक बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी तो चुकीच्या पद्धतीने सादर केला होता. तसेच त्यांना आणखी गीतेचे श्लोक सांगता आले नव्हते त्यामुळे त्यांना ही भेट पाठवण्यात आली आहे.
मी पाठवलेल्या ग्रंथाचे जितेंद्र आव्हाड यांनी अध्ययन करावे आणि चुकीच्या पद्धतीने गीतेच्या श्लोकांचे सादरीकरण करणे टाळावे, असं राम सातपुते यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती
-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!
-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल
-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप
-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!