“कर्तुत्व शून्य असताना गद्दारी करुन मिळवलेली खुर्ची गेल्याने तडफड सुरूये…”
मुंबई | महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपसह (BJP) राज्यपाल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुंबईमध्ये महामोर्चा काढला होता. यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चालत महामोर्चात सहभाग घेतला होता.
उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चावर नॅनो मोर्चा म्हणून टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत थेट देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर टीका केली आहे.
आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज मोर्चा होता, असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यातच फडणवीसांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. मात्र उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केल्या भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केलीये.
भाजप आमदार राम सातपुते यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी यासदंर्भात एक ट्विट केलं आहे.
खुर्ची गेल्यामुळे सध्या तोल चालला आहे. स्वतःचं कर्तुत्व शून्य असताना भाजपशी गद्दारी करुन मिळवलेली खुर्ची गेल्याने कीव यावी अशी तडफड सुरु आहे, अशी खोचक टीका राम सातपुते यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
लक्षात ठेवा त्याच फडणवीसांनी तुम्हाला आता घरात बसवलय. आता तेल मीठ ज्यातून चालायचं ती बीएमसी पण जाणार आहे, असंही राम सातपुतेंनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.