मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणा, भोंग्यांचा मुद्दा, हिंदूत्व यावरून राज्यात राजकीय गोंधळ चालू आहे. भाजपनं महाविकास आघाडी सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिल्याची भावना महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या एका वक्तव्यानं राज्यात वाद वाढला आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवावा, भाजपच्या 2-4 नेत्यांना आता टाका, असं खडसे म्हणाले होते. या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी एकनाथ खडसेंवर भोसरी जमीन प्रकरणाचा उल्लेख करत टीका केली आहे.
भोसरीला जमीन लाटण्याइतकं सोपं नाही ते. असल्या भुरसटलेल्या विचारांमुळंच मुक्ताईनगरच्या जनतेनं तुमच्या मुलीचा पराभव केला आहे, अशी टीका सातपुतेंनी केली आहे. खडसे यांच्यावर भोसरी एमआयडीसी परिसरात जमीन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. सातपुतेंनी त्याच प्रकरणावरून खडसेंना धारेवर धरलं आहे.
दरम्यान, भाजप-सेना सरकारच्या काळात खडसे क्रमांक दोनचे मंत्री होते. भाजपची सत्ता आणण्यात खडसेंचा मोलाचा वाटा होता पण त्यांनी पक्षनेतृत्वावर नाराज होवून पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला.
थोडक्यात बातम्या –
‘हिमायलात जाईन’ म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांसाठी राष्ट्रवादीकडून तिकीट बूक!
‘देवाचं नाव घेणं जर गुन्हा असेल तर…’; नवनीत राणांचं शिवसैनिकांना सडतोड उत्तर
“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, तरीही त्यांनी परंपरा पाळली नाही”
“एकटे नाना लढले तर फेस आला, मी लढलो असतो तर…”
‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!
Comments are closed.