बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लवकरच तुमचा माज उतरवला जाणार”; भाजप आमदाराचा शिवसेनेला इशारा

मुंबई | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर भाजप नेते टीका करत आहेत. अशातच भाजप आमदार राम सातपुते यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्रजींच्या घशात कोरोनाचे जंतू घालायचा विचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या तोंडात येत्याकाळात महाराष्ट्राची जनता शेण घातल्या शिवाय राहणार नाही, असं राम सातपुते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. गद्दारी करून सत्तेत आलेल्यांनी फार माज करू नये. लवकरच तुमचा माज उतरवला जाणार आहे याची नोंद घ्या, असंही राम सातपुते यांनी म्हटलं आहे. गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला  जनतेचे आशीर्वाद असल्याचं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सातपुतेंनी यावरून शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे आता सातपुतेंच्या टीकेला शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

घरात झोपला होता व्यक्ती, आरोपीनं डोकंच कापून स्वतःसोबत नेलं!

खासदार सुजय विखेंनी दिल्लीहून आणली 300 रेमडेसिवीर, नगरमध्ये मोफत वाटप

एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या दोघांसोबत भयानक प्रकार, गुप्तांगावर पेट्रोल टाकून…

“विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात”

आम्ही रेमडेसिवीर पाकिस्तान किंवा चायनाला देत होतो का?- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More