Ram Satpute | माळशिरस विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजप नेते राम सातपुते (Ram Satpute) लवकरच विधानपरिषद सदस्य होतील, असा दावा माढ्याचे माजी खासदार रणजीत निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांनी सांगितले की, येत्या चार महिन्यांत राम सातपुते विधानभवनात दिसतील, यासाठी वरून शब्द आणल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रणजीत निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. महालक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नावाने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी रणजीत निंबाळकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं.
या स्पर्धेत तब्बल 400 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा पाहण्यासाठी विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे प्रेक्षकांना उत्तम सोयीसह स्पर्धेचा आनंद घेता आला.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानपरिषदेवर संधी?
राम सातपुते हे माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Sharad Pawar group) उत्तम जानकर (Uttam Jankar) यांच्याकडून पराभूत झाले होते. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, आता विधानपरिषदेसाठी त्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जयकुमार गोरे यांच्या बदनामीमागे कट?
राज्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणावर विधानसभेत गदारोळ झाला. मात्र, रणजीत निंबाळकर यांनी यामागे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या एका विकृत नेत्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. ((Ram Satpute))
त्यांच्या मते, आठ वर्षांपूर्वीच हे प्रकरण न्यायालयात निकालात निघाले आहे. जयकुमार गोरे यांनी संबंधित महिलेला कधीच पाहिले नाही, हेही स्पष्ट झाले आहे. मात्र, राजकीय डावपेच म्हणून हे प्रकरण पुन्हा समोर आणले जात असल्याचं निंबाळकर यांनी यांनी म्हटलंय.
Title : Ram Satpute to Become MLC in Four Months Claims BJP Leader