कर्जत जामखेडमध्ये पुन्हा राम शिंदेचं!

अहमदनगर : कोणाचीही येऊ द्या हवा…. आम्ही हजारो भगिनी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत भावा असे सांगत कर्जत तालुक्यातील हजारो महिलांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.

बुधवारी गाठूया शिखर नवे……. महिला विकास सोहळा जिजाऊ मंगल कार्यालय,राशिन महिलांच्या भरगच्च उपस्थितीत व दणदणीत प्रतिसादातं संपन्न. त्यावेळी होय आमचं ठरलयं पुन्हा एकदा राम शिंदे अशा घोषणाही देण्यात आल्या.

जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात समाजप्रबोधनकार अ‍ॅड. अपर्णाताई रामतीर्थकर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ, धनश्रीताई विखे-पाटील व सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांनी मार्गदर्शन केले.

भारतीय जनता पक्षाच्या चित्राताई वाघ यांनी राशीन येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याला बुधवारी हजेरी लावली. त्यांनी प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करीत ते पुन्हां नामदार होणारच असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर उपस्थित महिलांना मौलिक मार्गदर्शन केले.

महत्वाच्या बातम्या-