अहमदनगर | सरकारमधल्या मंत्र्यांनी निर्णय करायचा असतो, मात्र दुर्दैवाने तेच आंदोलन करत आहेत. कोणी कोणाचं ऐकायचं नाही हा एकच किमान समान कार्यक्रम या सरकारमध्ये आहे. एका मंत्र्याने घेतलेला निर्णय दुसऱ्याने जाहीर करायचा आणि तिसऱ्याने सांगायचा असं सुरू आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर केली आहे. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाविकासआघाडी सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं कुणी ऐकत नाही असं सांगत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी येणाऱ्या 26 जून रोजी 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत, असं राम शिंदे म्हणालेत.
ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. तसेच ठाकरे सरकारमधले मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केला आहे.
सरकारला आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळे वेळकाढूपणा चालू असून चांगलं काम करायला वेळ नाही. त्यांचा मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणं यातच वेळ चाललाय. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारचा निष्काळजीपणा आणि नाकर्तेपणा समोर आल्याचंही राम शिंदे यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”
दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी
‘भावा गर्लफ्रेंड iphone मागत आहे’; चाहत्याच्या प्रश्नावर सोनूचं भन्नाट उत्तर, म्हणाला….
आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी
Comments are closed.