बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

अहमदनगर | रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करुन रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात, असा गंभीर आरोप भाजप नेते राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय?, असा सवाल राम शिंदे यांनी केलाय. कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांच्या पुढाकारातून झालेल्या विविध कामांचे उद्घाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची चौकशी सुरू आहे. मात्र, ही चौकशी जास्त प्रमाणात आपल्या कर्जत तालुक्यातच करण्यात येत आहे. ती कोणामुळे आणि कशासाठी केली जात आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, यामध्ये काहीही आढळून येणार नाही. त्यावेळी जलसंधारणाची सर्व कामे जनतेच्या हितासाठीच झाली होती, राम शिंदेंनी सांगितलं.

जलयुक्त शिवार कामाची चौकशी कर्जत तालुक्यातच जास्त सुरू आहे. पण कितीही चौकशी करा, यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असंही राम शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

चिंता वाढली! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ 

शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर; पुन्हा युती होणार?, नितेश राणे म्हणतात…

17 लाखाच्या चोरीचा बनाव; घडलेला प्रकार पाहून पोलिसांनीही टेकले हात!

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 16 कोरोनाबाधितांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More