पुणे महाराष्ट्र

जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय, मात्र सरकारकडून सूड बुद्धीने चौकशी- राम शिंदे

पुणे | जलयुक्त शिवार योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली योजना आहे. मात्र तरीही सरकारकडून आकस बुद्धीने आणि सूड बुद्धीने चौकशी केली जाते आहे, असा आरोप माजी जलसंधारण मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत कॅगने भ्रष्टाचार केला, असे म्हटलेलं नाही. पण खर्च काय झाला याबाबतच्या सूचना दिल्या आहे. या योजनेत स्थानिक पातळीवर पूर्ण सहभाग होता. ठाकरे सरकारने आकसबुद्धीने ही चौकशी केली. तरी त्यात काही निष्पन्न होणार नाही, असं राम शिंदेंनी म्हटलंय.

या योजनेतंर्गत पाणी संवर्धन, पाणी माथ्यावर जतन केलं आहे. जलयुक्त शिवार ही योजना पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. लोक समाधानी झाली आहेत. मग त्यात भ्रष्टाचार कसा काय झाला?, असा सवाल राम शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

मागील वेळी शिवसेनेचे मंत्रीही या खात्यात राज्यमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री का काही बोलले नाहीत, असा सवालही राम शिंदेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

रेखा जरे हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील फिल्मसिटी दुसरीकडे हलवणं सोप्प नाही- संजय राऊत

“माझ्याकडे 13 एकर आहे… तुला काम नसेल तर माझ्या शेतात मजुरीला ये”

“उद्धव ठाकरेंना आव्हान देणं हे योगी आदित्यनाथ यांना जमणार नाही”

“अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या