Top News

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही- राम शिंदे

अहमदनगर | जामखेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 वर पोहोचल्याची माहिती मिळाल्यावर माझं मन सुन्न झालं. मला रात्रभर झोप आली नाही, असं भाजप नेते राम शिंदे म्हणाले आहेत.

ज्याप्रमाणे बारामती येथे एक रुग्ण आढळल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रुग्णांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली त्याप्रमाणे जामखेडमध्येही भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे. शासनाने आणि प्रशासनाने निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी, अशी विनंती राम शिंदे यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण प्रशासन विशेष करुन जिल्हाधिकारी, अधिकारी, डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी या देवदुतांचे मनापासुन आभार मानतो आणि वंदन करतो, असं राम शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व जनता चांगलं सहकार्य करीत आहे. यापुढेही प्रशासनला असंच सहकार्य करावं, असं आवाहन राम शिंदे यांनी केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

वांद्रेची घटना सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडवली गेली- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या