अहमदनगर | चारा नसेल तर तुमची जनावरं पाहुण्यांच्या घरी नेऊन सोडा, असा संतापजनक सल्ला मंत्री राम शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाचं स्वागत करण्यासाठी राम शिंदे पाथर्डी येथील विश्रामगृहावर आले होते. यावेळी हा प्रकार घडला.
चाराछावण्या तसेच रोजगार हमीची कामं सुरु करा, अशा मागणीचं निवेदन आमदार मोनिका राजळे आणि नगरसेवक रमेश गोरे यांनी पालकमंत्री राम शिंदेंना दिलं. त्यावेळी त्यांनी हा विनोद केला. पालकमंत्र्यांच्या विनोदावर एकच हशा पिकला.
दरम्यान, राज्यात तीव्र दुष्काळ आहे, अशा दुष्काळावर राज्याच्या जबाबदार मंत्र्यांना विनोद सुचतो हे दुर्दैव आहे, असा संताप आता व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येणार नाही- अमित शहा
-सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 17 टक्के पगारवाढ?
-“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”
-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???
-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…
Comments are closed.