मुंबई | एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते राम शिंदे यांनी सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार फोडल्याचा आरोप केला. शिवाय राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
राम शिंदे म्हणाले, “रोहित पवार हे कोंबड्यांची पिल्लं, मासे तसंच बियाणं इथे आणून ते विकत असून समाजकारण नाही तर धंदा करण्यासाठी आलेत.”
राम शिंदे पुढे म्हणाले, “मी केलेल्या कामांचं भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते झालं असताना देखील रोहित पवार पुन्हा तेच भूमिपूजन करतात. तुकाई उपसासिंचन योजनेसह अनेक कामं बंद पाडली आहेत.”
“बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरलाय आणि त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. नवीन पर्व असं काही नसून हे सगळ्या गोष्टी खोट्या असल्याची”, टीकाही शिंदे यांनी रोहित पवारांवर केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडसे
मुंबई- सिटी सेंटर मॉलचे दोन मजले जळून खाक; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
“विरोधी पक्षनेत्यांनी आपले वजन वापरुन राज्याला विशेष मदत पॅकेज मिळवून द्यावं”
शिवसेनेच्या आमदाराकडून राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव