बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रोहित पवार एकदा मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

पुणे | कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते राम शिंदे यांनी टीका केली आहे. रोहित पवार एकदाच मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून टाकत असल्याचा आरोप राम शिंदेंनी केला आहे. जिल्हा परिषद सदस्य सुनीता खेडकर यांनी केलेल्या कामाच्या उदघाटन राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी शिंदेंनी खेडकर यांच्या कामांचं कौतुक करताना रोहित पवारांवर निशाणा साधला.

आमदार रोहित पवार एक दिवस येतात, दहा-पंधरा फोटो काढून जातात. नंतर सोशल मीडियावर पोस्ट करून रोज कार्यक्रम घेत असल्याचं दाखवतात, असाही आरोप राम शिंदे यांनी केला आहे. मतदारसंघाचा विकास फक्त फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर दिसतो मात्र  प्रत्यक्षात दिसत नाही, असं राम शिंदे म्हणाले.

रोहित पवार यांना मी मतदारसंघातील कामांबद्दल अनेक प्रश्न विचारले. मात्र रोहित पवारांकडून त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला ते घाबरतात काय?, असा सवालही शिंदेंनी रोहित पवारांना केला आहे. यावेळी बोलताना राम शिंदेंनी जलयुक्त शिवार योजनेच्या सुरू असलेल्या चौकशीवरही भाष्य केलं.

दरम्यान, मागील सरकारच्या काळातील जलसंधारण कामांची चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी कर्जत तालुक्या पुरतीच सुरू असल्याचं राम शिंदे यांनी सांगितलं.  ही चौकशी कशासाठी आणि कोणामुळे सुरू आहे हे सर्वांना माहिती आहे मात्र यामध्ये काहीही आढळून येणार नसल्याचं शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोनाकाळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

मोठी बातमी! चालू कार्यक्रमात अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका

“तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण…”

‘उद्धव ठाकरे आणि अजित पवार माझ्यावर पाळत ठेवत आहेत’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नितेश राणेंच्या जुळवून घेण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More