अहमदनगर | राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार आणि भादप नेते राम शिंदे यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रोहित पवार यांनी तीस लाखाचं जाहीर केलं आहे. हे बक्षीस म्हणजे लोकांना दिलेले प्रलोभन असून आचारसंहितेचे उल्लंघन करणारं असल्याचं आरोप राम शिंदेंनी केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी तीस लाखांचा निधी जाहीर करत आहेत. मात्र असंच सुरु राहील तर पुढील काळात टाटा बिर्ला देखील आमदार- खासदार होतील, असा टोला राम शिंदेंनी लगावला आहे.
दरम्यान, राम शिंदेनी केलेल्या या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोना रात्रीचा फिरतो का?, म्हणणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर; म्हणाल्या..
‘मी नक्की बाजी मारणार’; दीड महिन्याच्या चिमुकलीला घेऊन आई उमेदवारी अर्ज दाखल करायला केंद्रावर!
वयाच्या अवघ्या 17 वर्षी भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या या क्रिकेटपटूने केला भाजपमध्ये प्रवेश
आई-बापाची भांडणं; आता पोरानं आईविरोधात ठोकला शड्डू!