देश

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना रविवारी फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रामविलास पासवान राज्यसभा खासदार आहे. त्यांचं वय 73 वर्ष आहे. गेल्या काही तासांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्यने त्यांना रूग्णालयात हलवण्यात आलं आहे.

रामविलास पासवान यांनी 32 वर्षांत 11 निवडणुका लढल्या आहेत. यामध्ये त्यांनी 9 निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. ते व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजरात सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले.

दरम्यान, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रणव यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या