देशावर उपकार म्हणून राहुल गांधींनी राजकारण सोडावं- रामचंद्र गुहा

नवी दिल्ली | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतःच्या पक्षावर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडावं आणि दुसरा पेशा स्वीकारावा, असं परखड मत ज्येष्ठ लेखक आणि इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं.

 ‘इंडिया आफ्टर गांधी’ या रामचंद्र गुहांच्या पुस्तकाला १० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नितीशकुमार मोदींना पर्याय ठरु शकतात, त्यासाठी महाआघाडीचे नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडे देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र काँग्रेस असं कदापि करणार नाही, असंही ते म्हणाले.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या