…आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना अश्रू अनावर झाले!

नवी दिल्ली | प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद भावुक झालेले पहायला मिळाले. शहीद गरुड कमांडो जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करताना ही घटना घडली. 

झेंडावंदन आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर जेपी निराला यांनी आई आणि पत्नीला सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. यावेळी निराला यांच्या पराक्रम वर्णन करण्यात आला. 

निरालांचा पराक्रम ऐकून राष्ट्रपतींच्या डोळ्यात पाणी आलं. अशोक चक्र प्रदान केल्यानंतर ते जेव्हा पुन्हा जागेवर बसले तेव्हा त्यांनी रुमालाच्या सहाय्याने आपले पाणावलेेले डोळे पुसले.