…हा तर ‘राहुल द्रविड’ आणि ‘झहीर खान’चा जाहीर अपमान- रामचंद्र गुहा

मुंबई | राहुल द्रविड आणि झहीर खान यांची भारतीय क्रिकेट संघाच्या सल्लागारपदी झालेली नेमणूक रोखणे हा त्यांचा जाहीर अपमान असल्याचं ट्विट सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी केलंय. 

अनिल कुंबळेलाही यापूर्वी अशीच वागणूक देण्यात आली, त्यानंतर आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांचा अपमान करण्यात आला आहे, असं रामचंद्र गुहा यांनी म्हटलंय.

दरम्यान, गुहांच्या या ट्विटनंतर रवी शास्त्रींच्या मर्जीनं हे सगळं होतंय का? हा प्रश्न प्रकर्षानं विचारला जाऊ लागलाय. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या