बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर राजकारणात नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामावेशक विचारसणीकडे वाटचाल करायची असल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदर्श समोर ठेवावा लागेल, असं वक्तव्य प्रसिद्ध  इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केलं आहे. ते ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मोदी बदलतील का? ते इतर लोकांवर अधिक विश्वास ठेवतील का?, लोकांना श्रेय देतील का? असे अनेक प्रश्न आहेत. पण व्यक्ती कालानुरुप बदलू शकतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळ्यापणे विचार करणारे आहेत. पण उद्धव ठाकरे आता बदलले असून वडिलांच्या विचारसणीप्रमाणे न चालता ते राजकीय मार्गावर समतोल राखत चालण्याचा आणि मुख्य प्रवाहातील राजकारणाचा विचार करताना दिसत आहेत. त्यांनी निश्चय करुन आणि यशस्वीपणे हा बदल घडवून आणला आहे. तसाच बदल मोदींना स्वत:मध्ये करुन घ्यावा लागेल असं गुहा म्हणालेत.

देशात सध्या उद्भवलेली करोना परिस्थिती आता इतकी गंभीर नसती तर पंतप्रधांनी त्यांची धोरणं भारतातील उत्तम साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तयार केली असती. सध्याची मोदींची धोरणं ही नाट्यमय आणि नेत्रदीप ठेवण्यास प्राधान्य दिलं जातंय. तसेच थाळ्या वाजवणं, दिवे लागवणं, घरातील लाईट्स नऊ मिनिटांसाठी बंद करणं हे सारे प्रकार म्हणजे लोकप्रियता आणि अंधश्रद्धा असल्याचंही गुहा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदींना तज्ज्ञांची आवश्यकता वाटत नाही असं तेच म्हणाल्याचा संदर्भ देताना गुहा यांनी मोदींना शिक्षणाचं फारसं महत्व वाटत नसल्याची टीका रामचंद्र गुहा यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

प्रसिद्ध लोककलावंत ‘भारुडरत्न’ निरंजन भाकरे यांचं कोरोनाने निधन!

पुण्यात पुन्हा संपूर्ण कुटुंब कोरोनानं संपवलं, आई-वडिलांसह दोन भावांचा मृत्यू

सुमार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, राहुलचं दमदार अर्धशतक

सात दिवसांत कोरोना बरा करणाऱ्या ‘विराफिन’ औषधावर तात्याराव लहानेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली विजय वल्लभ हॉस्पिटलला भेट; केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More