बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

मुंबई | सध्या महाराष्ट्रात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीवरून अनेक राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्ती अनेक तर्कवितर्क ही लावत आहेत. दरम्यान, या सर्व प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या कवितांसाठी व कविता सादर करणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, कोणी कितीही रणनीती आखू द्या, आताही नरेंद्र मोदीच आहेत आणि 2024 मध्येही मोदीच असतील.

या सर्व प्रकरणात आता रामदास आठवले यांनी उडी घेतली असून त्यांनी एक भन्नाट कविता या घटनेला अनुसरून ट्विट केली आहे. “प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी! नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?” अशी भन्नाट कविता रामदास आठवले यांनी ट्विटरवरून शेअर केली आहे.

सध्या प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीमुळे अनेक राजकीय चर्चा सुरू आहेत तसेच ही भेट झाली असेल तरी प्रशांत किशोर यांना कोणत्याही प्रकारची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेली नाही. रामदास आठवले यांच्या कवितेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

थोडक्यात बातम्या

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…”

बाबो! ‘या’ माॅडेलने फक्त बेडशीट गुंडाळून केला फोटोशूट, पाहा तिचे बोल्ड फोटो

‘या’ जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यातून थेट पहिल्या टप्प्यात गरुडभरारी; उद्या सर्वकाही उघडणार

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही- अमोल कोल्हे

भोरमध्ये 10 वर्षीय मुलगा केंजळ गडावरुन पडला थेट 420 फुट खोल दरीत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More