अहमदनगर | रिपाइ अध्यक्ष रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी शिवसेनेला आणखी एकदा ऑफर दिली आहे.
शिवसेनेवर लोक नाराज आहेत. शिवसैनिकांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आतून विरोध आहे. त्यांना अजूनही वाटतं की भाजपसोबत जायला पाहिजे. अजूनही वेळ गेली नाही उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यांनी संजय राऊतांच्या भडकवण्याच्या मागे जाऊ नये, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे विचार करावा. अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर भाजपसोबत यायला हरकत नाही. दिर्घकाळ राजकारण करायचे असेल तर अजूनही विचार करण्याची वेळ गेली नाही, अशी ऑफर देखील रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना त्यांना जो विचार करायचा आहे करू द्या आम्हाला सत्तेची हाव नाही. अडीच वर्षे गेली आता आणखी अडीच वर्षे थांबायला आम्ही तयार आहोत. 2024मध्ये महाराष्ट्रात भाजप-आरपीआयचे सरकार येणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’, राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
“…तर मी धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल”
“पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन”
‘आमरण उपोषण मागे घेणार नाही’; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं….
“अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले होते का?”
Comments are closed.