रामदास आठवले शिंदेंवर नाराज?; मोठा निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात आणि भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. या वादात आणखी एक ठिणगी पडत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. या सगळ्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत असतानाच, आता या कहानीमध्ये आणखी एक नवीन ट्विस्ट आला आहे. कारण शिंदे गट-भाजपच्या युतीला पाठिंबा देणारा रिपाई पक्ष आता या युतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण केंद्रीय राज्यमंत्र व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले( Ramdas Athwale) शिंदेंवर नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचं नेमकं कारण काय आहे, हेच स्वविस्तर जाणून घेऊयात.

तर सध्या झालंय असं की, गेल्या आठवड्यात शिंदेंनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत हातमिळवणी केली आहे, म्हणजेच युती केलीय. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली.

पण या युतीमुळं रामदास आठवले नाराज आहेत. तसं त्यांनी स्पष्ट बोलूनही दाखवलं आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिंदे गटाच्या युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले की,जोगेंद्र कवाडे यांनी शिंदे गटाशी केलेल्या युतीमुळं आम्हाला काही हरकत नाही पण कवाडे यांना शिंदेंनी महायुतीत घेतल्यास आमचा विरोध असेल.

कवाडे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. एक राजकीय पक्ष म्हणून ते शिनसेनेसोबत युती करू शकतात. पण महायुतीत हा पक्ष असू नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आता शिंदे गट हा महायुतीचा एक भाग आहे. त्यामुळं कवाडे यांच्याशी युती करताना आम्हाला विश्वासात घ्यायला पाहीजे होतं, असं म्हणत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यामुळं कवाडेंच्या प्रवेशामुळं महायुती धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आता महायुती धोक्यात येण्याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बुधवारी मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक तब्बल अडीच तासांची होती. त्यामुळं या बैठकीत महत्वाच्या राजकीय मुद्द्यावंर चर्चा झाली असणार हे तर निश्चितच आहे. एकीकडं या बैठकीत वंचित बहुजन आघाडीची आणि शिंदे गटाच्या युतीबाबत चर्चा झाली असेल असा अंदाज लावण्यात येत आहे तर दुसरीकडं मात्र प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: काॅंग्रेस आणि ठाकरे गटाकडं युतीचा हात पुढं केला होता. त्यामुळं आता प्रकाश आंबेडकर नेमकी कोणासोबत युती करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पण या सगळ्यात जर आंबेडकरांनी शिंदेसोबत युती केली तर ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. आणि जर आंबेडकर आणि शिंदे गटाची युती झाली तर भाजप आणि शिंदे गटाचं वाकडं येण्याची शक्यता आहे.

एकीकडं कवाडेंच्या प्रवेशामुळं आठवले नाराज आहेत त्यातच जर शिंदेंनी आंबेडकरांसोबत युती केली तर महायुतीत धुसफूस आणखीच वाढू शकते.

महत्वाच्या बातम्या-