बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे पुन्हा राजकारणात उभारी घेतील असं वाटत नाही”

मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यापासून पक्षाला उतरती कळा लागली आहे. शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक एक एक करत पक्षाला सोडत आहेत तर काहींना शिवसेना, शिंदे गटाचे गोडवे गाईले म्हणून नारळ देत आहे. आता पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहेत. त्यांनी शिवसंवाद यात्रेचा प्रारंभ केला आहे. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील आता पुढील महिन्यात पक्षगळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

आता शिवसेनेच्या आजच्या वस्तूस्थितीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता राजकारणात पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतात असे वाटत नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे हे आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत असल्याने आता खरी शिवसेना आमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.

ज्यांच्याकडे बहुमत आहे ती खरी शिवसेना. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. त्यामुळे बहुमत त्यांच्याकडे आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंसोबत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांना नक्कीच न्याय देईल. निकाल त्यांच्या बाजूने लागेल. धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शविला.

रामदास आठवलेंच्या वक्तव्यावर अद्याप शिवसेनेने कोणतीही टिप्पणी केली नाही. परंतु शिवसेनेचे भवितव्य काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र शिवसेनेला सावरण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर त्यांच्या भवितव्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) न्यायप्रविष्ट आहे . त्यावर पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला सुनावणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘त्या’ भाषणावरून निलेश राणेंची शरद पवारांवर टीका, फोटो शेअर करत केला भांडाफोड

‘पक्ष पळवला आता वडील पळवत आहात, तुम्ही बंडखोर नव्हे दरोडेखोर’; उद्धव ठाकरे आक्रमक

सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मोठी बातमी! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More