बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामदास आठवलेंनी घेतली नारायण राणेंची भेट; दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू इथल्या घरी जात भेट घेतली. तसंच आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे.

नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचं होतं. पण तसं न करता चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवं होतं. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे, असं आठवले म्हणाले.

नारायण राणे अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी. राणे यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे, असं आठवले यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

देशात रोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या आकडेवारी !

महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ, पाहा आकडेवारी!

“संजय राऊत संपादक बनण्याच्या लायकीचे नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More