बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार जातीवादी नाहीत”; पवारांवर केंद्रीय मंत्र्याची स्तुतीसुमनं!

लातूर | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यात मोठा राजकीय वाद उद्भवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जातीवाद वाढवला आहे, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या वादावर आपलं मत मांडलं आहे. शरद पवार हे जातीवादी नाहीत असा माझा अनुभव आहे, असं आठवले म्हणाले आहेत. आठवले लातूर येथील कार्यक्रमात बोलत होते.

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत, असंही आठवले म्हणाले आहेत. भोंग्याच्या समोर हनुमान चालीसा लावा पण भोंग्याला विरोध करणं चुकीचं आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. परिणामी आता मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आपल्या राज्यात सर्व रिपब्लिकन संघटनांनी एकत्र यायला हवं, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. आठवलेंनी आपल्या कवितांच्या माध्यमातून कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणल्याचा पाहायला मिळालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

Russia-Ukraine War| युक्रेनसाठी अमेरिकेने उचललं मोठं पाऊल

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील फरार

रणबीरच्या आधी ‘या’ अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं आलियाचं नाव

रेल्वेचा प्रवाशांना दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मंजुलिका’ पुन्हा परतली….; ‘भूल भुलैंया 2’ चा धमाकेदार टीझर रिलीज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More