सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आठवलेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…
मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनेचा विचार करायला हवा. गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन चालू आहे पण सरकार विचार करत नाही म्हणून हा प्रकार घडला आहे. शरद पवार यांच्या घरी हल्ला होणार याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का?, असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका आठवलेंनी केली आहे. परिणामी राज्यात वाद वाढला आहे. आठवले हे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर न घेण्याचा निर्णय अयोग्य असल्याचंही आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर आता सरकार आणि आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये कायदेशीर लढाई आणखीनच तीव्र झाली आहे. त्याचबरोबर गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.
थोडक्यात बातम्या –
देशातील कोरोना रूग्णांबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
“मातोश्रीत बसून सत्ताफळं खाणाऱ्यांनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात”
महाराष्ट्रातील ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार
‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा
सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास
Comments are closed.