बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे- रामदास आठवले

मुंबई | देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असंही रामदास आठवले म्हणाले.

जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ती काळाची गरज आहे, असं आठवले म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘इतके’ कोरोना रुग्ण सापडल्याने सुनिल शेट्टींची इमारत सील!

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही- संजय राऊत

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More