बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय

मुंबई | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. आता या प्रकरणावर रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी एक उपाय सांगितला.

मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असं आठवले म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवून देण्यासाठी मोदींना साकडं घालणार असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.

मराठा समाजाप्रमाणे देश भरातील जाट, राजपूत, रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12 टक्के आरक्षण द्यावं अशी माझी मागणी  आहे, असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

देशावर कोरोनाचं संकट; आरबीआयने केली ‘ही’ मोठी घोषणा

‘अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे सरकारचं अपयश, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक क्षण- विनोद पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More