Top News महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरे पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही”

पालघर |  उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण पुढे किती दिवस ते मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नसल्याचं केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

औरंगाबादच्या नामांतरवरून सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध असल्याचं जाहीरपणे स्पष्ट सांगितलं. त्यामुळे शिवसेना सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. याच पार्श्वभूमीवर आठवलेंनी महाविकास आघाडी पडणार असल्याचं म्हटलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरून वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडेल, असं भाकीत आठवलेंनी वर्तवलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या वादात पडू नये असा सल्ला आठवलेंनी दिला आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराला आमचाही विरोध असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी कोरोनाची लस घेणार नाही, कोरोनाचे किती अवतार येऊदे मला काही होणार नाही”

“‘त्या’ मध्यरात्री मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता…’; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितली अंदर की बात

‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे’; सोनिया गांधींची मोदी सरकारवर जहरी टीका

“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”

औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमधील विरोधाभासावर अजित पवाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या