बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत’; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

पुणे | स्व. नेते गोपीनाथ मुंडे यांचे आयुष्य भाजपमध्ये गेलं आणि पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करू नये, अंसा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री सामाजिक समाजकल्याण मंत्री रामदास आठवलेंनी केला आहे.

देशातील सर्व जाती धर्मांचा विचार करून मंत्री मंडळात नेत्यांना स्थान गेले आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचा नंबर लागला नाही. पंकजा या भाजपमध्येच राहतील यात शंका नसल्याचंही रामदास आठवले म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.

एल्गार परिषद व भिमा कोरेगाव दंगल याचा काहीही‌ संबंध नाही. एल्गार परिषदेतील भाषणांमुळे नक्षलवाद वाढू नये म्हणून संशयितांवर कारवाई सुरू आहे. जे आंबेडकरवादी आहेत ते नक्षलवादी विचाराचे असू‌ शकत नाहीत, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या 25 टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास 9 टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना 10 टक्के शिक्षण आणि नोकरीचं आरक्षण मिळेल, असा सल्ला आठवलेंनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर अजिबात नाही”

ईडीची अनिल देशमुखांवर मोठी कारवाई, तब्बल इतक्या कोटींची संपत्ती जप्त

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

“तिसऱ्या लाटेला सामोरे जायला आपण सज्ज असलो, तरी पुण्यातील निर्बंध कायम राहणार”

“बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More