मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. याचा परिणाम इतर राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षात बंडखोरी होणार असल्याचं भाकीतही आठवलेंनी रामदास आठवलेंनीही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसला त्यांच्या पक्षात नेते संभाळता येत नाहीत. उद्वव ठाकरे यांनी आमच्याकडं यावं. तसं झालं तर मजबूत सरकार राज्यात अस्तित्वात येईल, असं म्हणत आठवलेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्तास्थापनेचं आमंत्रण दिलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है
पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु
महत्वाच्या बातम्या-
“काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार”
ज्योतिरादित्य शिंदे तो झांकी है ! सचिन पायलट और मिलिंद देवरा अभी बाकी है
ज्योतिरादित्य नंतर महाराष्ट्रातला हा बडा नेता काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत?
Comments are closed.