बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2024 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान- रामदास आठवले

नवी दिल्ली | येत्या निवडणुकीत देशात कोणाची सत्ता येणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येत पक्षबांधणीला सुरूवात केल्याचं दिसत आहे. सत्तांतर करण्यासाठी विरोधी पक्ष आपली पुर्ण ताकद पणाला लावून मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे भाजपनेही केंद्रात आपली सत्ता कायम टिकवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 2024 साली मोदीच पंतप्रधान होणार असल्याचं म्हटलं आहे.

2024 साली पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार निवडून येणार आहे. विरोधी पक्षामध्ये मोदींना आव्हान देणारा एकही नेता नसल्याचं रामदास आठवले म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे, असंही आठवले म्हणाले.

केंद्र सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगॅसिस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं आठेवलेंनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांना रायगडमधील एनडीआरएफचा बेस कॅम्पबाबतही भाष्य केलं.

दरम्यान, महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे. तसा प्रसत्व आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न करू, असं आठवले म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत”

‘चंद्रशेखर बावनकुळे सरकार पाडण्यासाठी झारखंडला गेले होते’; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपावर बावनकुळेंनी सोडलं मौन,म्हणाले…

महत्त्वाची बातमी! राज्यातील 25 जिल्हयांमध्ये निर्बंध शिथिल तर या 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

“राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पाचे संंबंध ठीक नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More