Top News महाराष्ट्र मुंबई

सचिन आणि लता मंगेशकर यांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे- रामदास आठवले

मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी ट्विट केल्याने ते अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने या सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सरकारवर टीका केली आहे.

अमेरिकन पॉप स्टार रिहाना यांनी केलेल्या भाष्यावर राष्ट्रप्रेमी उत्तर देणारे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकरांचा महाराष्ट्र सरकारला अभिमान वाटला पाहिजे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटच्या चौकशीचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा आणि निषेधार्ह असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंच्या या टीकेवर महाविकास आघाडीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

बिग बाॅस फेम राहुल वैद्य दिशा परमारसोबत बांधणार लगीनगाठ!

‘शिवसेना हे आमचं जुनं प्रेम त्यामुळे…’; नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाईन गिफ्ट

बॅालिवूड सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं दुख:द निधन

‘तुम्ही भाषा बदलली नाही तर…’; निलेश राणेंचा राऊतांना इशारा

“मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या