बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपासला- रामदास आठवले

ठाणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खुपसला होता, असं म्हणत माजी मंत्री आणि शिवसेना नेत अनंत गीते यांनी पवारांवर टीका केली होती. केलं  होती. या टीकेला केंद्रीय मंत्री आणि रिपाइचे नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीसाठी ते कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

1998मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गीते यांचा आरोप चुकीचा असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही यावं आणि भाजप, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भीमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असं म्हणत आठवलेंनी युतीसाठी शिवसेनेला ऑफर केलं आहे. यावेळी बोलताना आठवलेंनी शिवसेना नेते संजय राऊतांना सल्ला दिला आहे.

दरम्यान, संजय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. त्यासोबतच खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांन चुकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवलेंनी राऊतांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! IPL पुन्हा थांबवणार??? ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित

“56 वाल्यांचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर 119 वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?”

बाॅयफ्रेंड तुझा की माझा?, तरुणींचा मॉलमध्ये राडा, पाहा व्हिडीओ

रस्त्यावर उभं राहत मुंबईतील पठ्ठ्यानं केलं असं काही की…, व्हिडीओ तुफान व्हायरल

उद्यापासून राज्यात सलग 3 दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More