बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणात काहीही होऊ शकतं नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात”

सांगली | एमपीएससी परीक्षा, मनसुख हिरेन मत्यू प्रकरण आणि मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठीचं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलं आहे. अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंनी राज्यातील राजकारणाबाबत अनेक दावे केले आहेत.

राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसुद्धा आमच्याकडे येऊ शकतात. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाच वर्ष पण टिकू शकणार नाही. कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही आपलं मत मांडलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आमचं समर्थन आहे. मी स्वतः याबाबतची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे,  असं रामदास आठवले म्हणाले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी अशी आमचीही अपेक्षा असल्याचं आठवलेंनी सांगितलं. तर यावेळी आठवलेंनी आपल्या ‘गो कोरोना गो’ या प्रसिद्ध घोषणेनंतर ‘गो कोरान नो कोरोना’, अशी नवीन घोषणा दिली.

दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नाना पटोलेंकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुले आठवलेंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक  चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांनी केेलेल्या ‘त्या’ भाकीतावर देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले…

आई गेली देवाघरी तर बापाने सोडलं वाऱ्यावर, बहिणीसोबत राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीने उचललं धक्कादायक पाऊल

“शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत”

‘मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या नेत्यांनी…’; देवेंद्र फडणवीसांचा सचिन वाझेंबाबत मोठा गौप्यस्फोट

ही तर फक्त सुरूवात आता महत्वाचा भाग बाहेर येणं बाकी- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More