Top News महाराष्ट्र मुंबई

“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”

मुंबई | औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. काँग्रेसचा नामंतराला विरोध असल्याने शिवसेना मोठ्या पेचात पडली आहे. मात्र अशातच केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरून वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं भाकीत रामदास आठवलेंनी केलं आहे. पालघरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेला औरंगाबादच्या नामांतर करायचं होतं तर त्यांनी युतीत असताना का केलं नाही?, असा सवाल आठवलेंनी केला आहे. त्यासोबतच ठाकरे सरकार पडणार असून राज्यात भाजप-आरपीआयचं सरकार येणार असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामदास आठवलेंनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मी ‘त्या’ पैशातून तीन कोटी 75 लाखांचं नवीन कार्यालय विकत घेतलं’; मातोंडकरांनी केला खुलासा

“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”

“मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?

‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागणी

“लस टोचणं हे स्किल, मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या